बीड: जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेची वाहतूक घोषणा करूनही यंत्रणेला थांबवता आले नाहीये. मात्र जे यंत्रणेला जमले नाही ते काम महिलांनी करून दाखवले आहे. नियम धाब्यावर बसवून येथील राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर अडवून वाहतूक करणाऱ्या चलकांना चांगलाच चोप येथील महिलांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायराल झाला आहे.
परळी आणि अवैध राख वाहतूक हे पूर्वी पासून चालतच आले आहे. यात यंत्रणेचे देखील चांगलेच संबंध असल्याने वाहतूकीसाठी तयार केलेले नियम कायम धाब्यावर बसवले जात आहेत. राख वाहतूक करणारे जवळपास ५०० च्या वर हायवा टिप्पर आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी राख परिसरातील विटभट्ट्यांसाठी वापरली जाते. या राखेची वाहतूक करत असताना हायवा टिप्पर अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त व काही वेळा उघडी वाहतूक केली जाते.
गुरुवारी सायंकाळी राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर मधून गतीरोधकाजवळ मोठ्या प्रमाणावर राख पडली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हवेच्या माध्यमातून प्रदूषण झाले. काही घरात ही राख हवेतून उडू लागल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर येवून वाहतूक करणारे हायवा टिप्पर अडवले व ड्रायव्हरला चप्पलने चांगलाच चोप दिला. ऐवढ्यावर न थांबता या सर्व ड्रायव्हरला चक्क रस्त्यावर पडलेल्या राखेची साफसफाई करण्यास भाग पडले. यादरम्यान जवळपास १०० च्या वर हायवा टिप्पर अडवून ठेवण्यात आले. ग्रामीण पोलिसांना माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या गाड्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- भाजपाचे नेते ओबीसींचा बुध्दीभेद करणारी विधाने करत आहेत – छगन भुजबळ
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी; चर्चांना उधाण
- व्यापाऱ्यांवरील ‘शास्ती’ करा विरोधात आमदार जैस्वाल यांचे नगरविकास मंत्र्यांना पत्र
- केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले – जयंत पाटील
- आणीबाणी : फक्त एका कुटुंबाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
