उस्मानाबाद : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, झाडाझडती होताना अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
आता अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘सर्व एजन्सीचा वापर केल्यानंतर अनिल देशमुखांकडे काही सापडत नाही म्हटल्यावर त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. दहा वर्षापूर्वी काही झाले असेल त्यासंदर्भात गुन्हा दाखल करायचा आणि छापेमारी करायची हा आता सगळ्यांचाच अनुभव आहे’, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेसह वाहन चोरट्यांनी तिघांच्या दुचाकी लांबविल्या
- ‘या’ खेळाडुचा जीव रंगला दिशा पटानीत! तिच्यासोबत इंग्लंडमध्ये सुटी घालवण्याची इच्छा
- भाजपाचे नेते ओबीसींचा बुध्दीभेद करणारी विधाने करत आहेत – छगन भुजबळ
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी; चर्चांना उधाण
- व्यापाऱ्यांवरील ‘शास्ती’ करा विरोधात आमदार जैस्वाल यांचे नगरविकास मंत्र्यांना पत्र


