Share

पापाचे घडे भरले की, सत्तेची मस्ती जनताच उतरवेल, दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.

आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. अर्नबवर केलेली कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. असे आरोप विरोधी पक्ष करत आहेत. अशात राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने आज आणखी हीन पातळी गाठली… निर्भीड पत्रकाराला एका जुन्या केससाठी गजाआड केलं, द्वेशमूलक राजकारणाचा कळसं गाठला गेला आहे, असेच पापाचे घडे भरले की, सत्तेची मस्ती जनता उतरवेल…, ज्यांनी आणीबाणी लादली, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार… पत्रकारितेवरील हा सरकारपुरस्कृत हल्ला आहे, मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!