🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगरमधील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला. यानंतर एकनाथ खडसेंनंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा होती.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत राज्यातील काही आजी-माजी आमदार जातील, अशी शक्यता काही नेते व्यक्त करीत होते. त्यामध्ये कर्डिले यांचेही नाव घेतले जात होते. या चर्चेला मात्र कर्डिले यांनी वारंवार पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपमध्येच राहणार असून, राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा ही केवळ चर्चाच असल्याचेच त्यांनी विविध ठिकाणी भाषणातून यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात असताना ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी माझ्यावर एक संकट आले होते. त्यावेळी मला एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्यात आले होते. तेव्हा माझ्यावरील अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी एकनाथ खडसे नगरमध्ये आले होते.
त्यामुळे त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. असे असल्यानेच लोक माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा करत असतील. मात्र ज्यावेळी ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी हा विषय संपलाय, असेही शिवाजी कर्डीले यांनी स्पष्ट केले आहे.
खडसे जोपर्यंत भाजपमध्ये होते, तोपर्यंत नेते म्हणून एकमेकांशी संबंध होते. आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे संबंध असण्याचे कारण नाही. साहजिकच काही विरोधी मंडळी माझा संबंध जोडून माझ्या राष्ट्रवादीत जाण्याबाबत अफवा पसरवितात. परंतु त्यात काहीच तथ्य नाही. आगामी काळात भाजपच सत्तेत येणार आहे, असे सांगून कर्डिले यांनी खडसे यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत स्पष्टता केली.
महत्वाच्या बातम्या
- केदारनाथ मंदिराला बर्फाची शाल ! पहा नेत्रदीपक फोटो
- याला राजकारण ऐसे नाव ! तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?
- आयपीएल नंतर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा देखील होणार यूएईमध्ये
- अर्णब गोस्वामीला कोठडी की जामीन? अलिबाग न्यायालयाकडे देशाचं लक्ष
- बँक ऑफ बडोदाने लागू केलेली शुल्कवाढ एकाच दिवसात मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
