मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.
दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये टीकेचं युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे गोस्वामीवर ही कारवाई सूडबुद्धीने केली गेल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.
‘नाईक परिवाराला न्याय मिळाला पाहिजे याबाबत शंका नाहीच. पण शिवसेना देखील २०१४ पासून सत्तेत आहे. गृह मंत्रालय खातं देखील शिवसेनेकडे होतं. मग एकाही सेना आमदाराने विधानसभेत न्यायासाठी आवाज का नाही उठवला? जर सुशांत आणि दिशाचा मृत्यू झालाच नसता तर आजचा तमाशा कधीच घडला नसता’ अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.
Naik family shud get justice n there is no doubt abt that..but wasn’t Sena in the gov since 2014?they even had state home ministry!Y didn’t a single Sena MLA ask 4 justice in Vidhan Sabha since then?If Sushant n Disha deaths didn’t happen..Today’s Tamasha wud hv never happened!
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- केदारनाथ मंदिराला बर्फाची शाल ! पहा नेत्रदीपक फोटो
- याला राजकारण ऐसे नाव ! तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?
- आयपीएल नंतर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा देखील होणार यूएईमध्ये
- अर्णब गोस्वामीला कोठडी की जामीन? अलिबाग न्यायालयाकडे देशाचं लक्ष
- बँक ऑफ बडोदाने लागू केलेली शुल्कवाढ एकाच दिवसात मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

