अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत तसेच पतसंस्था, बँकांकडील महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केली होती.
परंतु आता मोर्चा काढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत तसेच पतसंस्था, बँकांकडील महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत सोमवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली होती. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबरला दिला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मनसे सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे, सरचिटणीस अनिल चितळे, ज्ञानेश्वर गाडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, बाबासाहेब शिंदे व इतर दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन गोरे यांनी फिर्याद दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केदारनाथ मंदिराला बर्फाची शाल ! पहा नेत्रदीपक फोटो
- याला राजकारण ऐसे नाव ! तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?
- आयपीएल नंतर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा देखील होणार यूएईमध्ये
- अर्णब गोस्वामीला कोठडी की जामीन? अलिबाग न्यायालयाकडे देशाचं लक्ष
- बँक ऑफ बडोदाने लागू केलेली शुल्कवाढ एकाच दिवसात मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

