🕒 1 min read
सोलापूर:- युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ पुरस्कार जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घरी जाऊन सहकुटुंब सत्कार केला आणि पेढे भरविले. यावेळी दरेकर यांनी फोनवरून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी फडणवीस आणि पाटील यांनी डिसले यांना त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या ९ शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या ९ शिक्षकांचा देखील सन्मान होणार आहे.
आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे की, शिक्षक मतदारसंघात शिक्षक नसलेला आमदार होतो. जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक अडचणींना सामोरे जात काम करीत आहेत, त्यांना डिसले हे प्रेरणादायी आहेत. डिसले यांना ७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला, यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि काम करावे, असे मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- ‘काळे फासण्याच्या धमक्यांना भीत नाही,म्हणूनच तारीख आणि वेळ जाहीर करुन मी शिर्डीत येतेय’
- विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे : अशोक चव्हाण
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- कृषी कायद्यांविरोधात काही लोक राजकीय हेतूनं गैरसमज पसरवत आहेत : खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
