🕒 1 min read
सोलापूर: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले आहे. भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने अजूनही त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. केवळ सत्ता जाण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
खरे तर नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता. पण सरकारने राजीनामा घेतला नाही. संजय राठोड यांच्यावर आरोप होताच त्यांचा राजीनामा घेतला. पण राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेईल की काय या भीतीने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही. असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव हे अभियान सुरू केलं आहे. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी एका मुलीला आत्महत्या करायला भाग पाडलं. हसन मुश्रीफ यांच्या जावयाने टेंडर घेतले. त्यांच्यावर आरोप झाले. नवाब मलिकांनी सोमय्यांना आयटम गर्ल म्हटले. नारायण राणे आणि नितेश राणेंवर कारवाई झाली. जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. यात भाजपने कुठेही तक्रार केली नव्हती. या सर्व प्रकरणात भाजपचा संबंध काय?असा सवालही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. दरम्यान एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी होत नाहीत, असा जावई शोध महाविकास आघाडीने लावला असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान कार्यालयाला पुरावे सोपवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
- छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब- चंद्रकांत पाटील
- ‘…त्यांना मदतीची गरज आहे’; युक्रेनहून परतलेल्या सोनालीची प्रतिक्रिया
- संभाजी भिडेंचे वादग्रत वक्तव्य; म्हणाले,‘डॉक्टर XXXच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’
- “पुजाराच्या जागी शुभमनला संधी द्यावी” माजी निवडकर्त्याचा संघ व्यवस्थापनाला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
