Share

“पुजाराच्या जागी शुभमनला संधी द्यावी” माजी निवडकर्त्याचा संघ व्यवस्थापनाला सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली कसोटी देखील भारताच्या मधल्या फळीतील शुभमन गिल आणि हनुमा विहारीसह अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याजागी बदलीत एका नवीन युगाची सुरुवात करेल. आता हे स्पष्ट झाले आहे की रहाणे आणि पुजाराला या मोसमातील तीन कसोटींसाठी (श्रीलंकेविरुद्धच्या दोन आणि इंग्लंडविरुद्धच्या एक सामन्यासाठी) बोलावले जाणार नाही, जेथे विहारी आणि गिल, श्रेयस अय्यरसह बॅकअप म्हणून पर्याय असतील. भारताने केपटाऊनमध्ये खेळलेल्या शेवटच्या कसोटीतील दोन जागा रिक्त आहेत आणि विराट कोहली मोहाली येथे त्याची १०० वी कसोटी खेळत असताना, हे तिन्ही तरुण या दोन दिग्गज खेळाडूंनी मोकळ्या केलेल्या स्पॉट्ससाठी पूर्ण जोर लावून खेळताना दिसतील.

भारतीय संघापुढे मात्र एक सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे .४ मार्चपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत तिघेही तंदुरुस्त राहिल्यास कोणाला संघातून डावलले जाईल? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड शुभमन गिलला (shubhman gill) सलामी ऐवजी मध्यम फळीत खेळवू शकतील असा अंदाज लावण्यात आला आहे. माजी निवडकर्ता देवांग गांधी (devang gandhi) यांनी सुद्धा हेच सांगितले आहे. “माझा विश्वास आहे की शुभमान हा भारताचा तिस-या क्रमांकावरचा खेळाडू आहे. होय, त्याने सलामी दिली आहे पण मयंक रोहितसोबत आहे आणि शुभमनकडे त्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी आहे.”

देवांग गांधी जानेवारी २०२१ पर्यंत राष्ट्रीय निवडकर्ता होते, त्यांनी असेही सांगितले की गिल सुरुवातीला ऑस्ट्रेलियात सलामीवीर म्हणून कसोटी पदार्पण करण्यापूर्वी मधल्या फळीतील भूमिकेसाठी तयार होता.”मला असे का वाटते की संघ व्यवस्थापन त्याला तिसऱ्या क्रमांकावर वापरण्याचा प्रयत्न करू शकेल कारण जेव्हा आम्ही त्याला भारत अ सिस्टीममध्ये आणले तेव्हा त्याने वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडिज ‘अ’ विरुद्ध मधल्या फळीत द्विशतक झळकावले होते. कसोटीमध्ये आधीच ओपनिंग केल्यामुळे, नंबर ३ म्हणून तो नवीन चेंडू देखील चांगला खेळू शकतो आणि त्याच्या स्ट्रोकच्या साहाय्याने खेळाला पुढे नेऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!