🕒 1 min read
मुंबई: संभाजी राजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरवात केली होती. दरम्यान काल (२८ फेब्रुवारी) राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे वाचन त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर केले. संभाजी छत्रपती यांच्या काही मागण्या मान्य झाल्याने त्यांनी काल उपोषण मागे घेतले. मात्र यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे.”, अशी अपेक्षा व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे. pic.twitter.com/GzzOQ80Q5p
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 1, 2022
दरम्यान मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने छत्रपती राजेंनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. तसेच पाठिंब्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आभारही त्यांनी मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
पाकिस्तान दौरा मध्यात सोडत आयपीएल खेळण्यावर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा आक्षेप
-
“… तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते”, जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य
-
“सत्तेचा माज म्हणजे शिवसेना”, महिला मारहाण प्रकरणावरून भातखळकरांचा हल्लाबोल
-
डेव्हिड वॉर्नर चित्रपटात काम करणार? इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा
- “महाविकास आघाडीची जत्रा आणि कारभारी सतरा”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
