ठाणे : ठाणे शहरात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या यात्रेमध्ये करोना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाणे येथे बोलताना संताप व्यक्त केला आहे. ‘आमची यात्रा अयशस्वी करण्यासाठीच गुन्हे दाखल केले जात आहेत. मोदींना आशीर्वाद देण्यासाठी लोक रॅलीत येत आहेत. त्यांना कोणीही बोलावत नाही. सरकारचे कार्यक्रम होतात. त्याला गर्दी होते. ती चालते. फक्त आमच्या कार्यक्रमांकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी या सरकारची रित आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात हजारोंची गर्दी झाली होती. जालना, नाशिक, बीड या ठिकाणी झालेल्या सरकारी पक्षांच्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. त्यांनी गर्दीचे कार्यक्रम केलेले चालतात, फक्त आम्हालाच नियम का दाखवले जातात?, असा सवालही त्यांनी केला.
मंत्री कपिल पाटील यांनी राऊतांना सुनावले
‘कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो. तिथे प्रचंड गर्दी असते. याचा अर्थ सरकार पुरस्कृत शिवसेनेच्या रॅलींमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात ५ ते १० हजार नागरिक जमा होता. तिथे कोरोना होत नाही. भारतीय जनता पक्षाने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते?, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राऊतांना विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’
- ठाकरे टॉप फाईव्हमध्ये! दरेकर म्हणाले, ‘कशाच्या आधारावर सर्व्हे केला? त्यांना काय अधिकार?’
- ‘..तेव्हा तुम्ही तर उकिरडे फुंकत हिंडलात’, संजय राऊत भाजपवर चिडले
- ‘उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरणार’, संजय राऊतांचा विश्वास
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!


