नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास सरकार आहे. परंतु कॉंग्रेस सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून बोचरी टीका केली.
तर काल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं लेटरबॉम्ब समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सध्या सत्तेत सोबत असलेले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा खळबळजनक आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.
महाराष्ट्रातील अशा राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अचानक दिल्ली गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लगावले जात आहेत. या दिल्ली दौऱ्यामध्ये शरद पवार नेमके कोणा-कोणाला भेटणार ? या अचानक ठरवलेल्या दौऱ्याचे नेमके कारण काय ? असे एक न अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. दरम्यान, काही वेळेपूर्वीच पुन्हा एकदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्याचे समोर आले आहे.
पवार-किशोर यांची ही दुसरी भेट असून या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर खलबतं झाली हे मात्र गौप्यच आहे. भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती ते आखत आहेत. यासोबतच, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता आघाडीत बिघाडी झाल्यास मध्यावधी निवडणुकांच्या तयारीबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे लक्षात ठेवावे-हसन मुश्रीफ
- ‘मराठा व ओबीसी आरक्षण ही तुमची जबाबदारी, केंद्राकडे बोट दाखवू नका’, पंकजा मुंडेंचा ठाकरेंना इशारा
- ‘तू फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर, आणि ‘हे’ ट्विट फ्रेम करून लाव’ ; वॉर्नच्या ट्विटवर सेहवागची प्रतिक्रिया
- खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरवात
- मुलासाठी घेतल्याच्या ३ कोटीच्या कारबाबत सोनू सुदने केला खुलासा
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

