मुंबई : पत्रकार आणि लेखिका राणा अयुब यांना सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेसेजच्या माध्यमातून काही लोक राणा अयुब यांच्यावर खालच्या भाषेत बोलत आहेत.
या सर्व मेसेजेसचे स्क्रिनशॉट आपल्या ट्विटरवर शेअर करत राणा अयुब यांनी महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या ट्विटची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आणि पोलिसांनी तात्काळ करवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर काही तासातच नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
राणा अयुब यांच्या ट्विटला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सायबर बुलिंग हा सोशल मीडियावरील सध्या कळीचा मुद्दा बनला असून सरकारने त्यावर त्वरीत लक्ष घालावे. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नवी मुंबई पोलिसांना याबाबत अवगत करुन कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती.
राणा अयुब यांना सोशल मीडियावर सतत अश्लाघ्य भाषेत मेसेजेस पाठवले जात आहेत. जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर करुन राणा अयुब यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलीस या लोकांवर कारवाई करतील का? असा प्रश्न विचारला होता.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राणा अयुब यांचे ट्विट शेअर करत सायबर बुलिंगचा निषेध केला. सोशल मीडियावरील नेटिझन्सना याचा फार त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. राणा अयुब यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले होते. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी टॅग करण्यात आले होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील याची लागलीच दखल घेत कारवाईचे आश्वासन दिल. त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत ज्या अकाऊंटवरुन शिवीगाळ करण्यात आली, त्यांचा शोध सुरु केला आहे. त्याच्याच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नानांनी हाती घेतलं ‘धनुष्यबाण’; काँग्रेसने ट्विट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
- उद्धवजी… राज्याच्या समोर समस्यांचा डोंगर… २ दिवसांच्या अधिवेशनात प्रश्न मांडायचे तरी कसे ?
- ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा’; अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
