Share

महाविकास आघाडीतील बिघाडी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तलवार म्यान केली ?

Published On: 

मुंबई – मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका हस्तांतरित करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्थगिती दिल्याने मोठा हलकल्लोळ माजला होता. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवाना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सदनिका हस्तांतरणाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यानी स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.

कर्करोगग्रस्तांच्या उपचारासाठी परळच्या टाटा रुग्णालयात महाराष्ट्राच नव्हे, तर देशभरातून रुग्ण येत असतात. त्यांच्यासोबतच नातेवाईक, काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईत नसल्यामुळे त्यांची परवड होते. खासगी जागा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे बरेचदा नातेवाईकांना फूटपाथवर राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारच्या म्हाडा उपक्रमाने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कासम हाजी इमारतीत देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. स्थानिक आमदारांनी त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांना सांगितल्या गेल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजच्या काल त्याच परिसरात जागा शोधा आणि त्या द्या अशा सूचना केल्या.त्यानुसार बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका आहेत, त्या देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीने घेतला गेला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

दरम्यान, या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळत आहे.शरद पवार यांचा देखील या निर्णयाशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तलवार म्यान केल्याचे सांगण्यात येत असले तरीही मुख्यमंत्र्यांनी जनहित लक्षात घेवूनच हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला होता. आव्हाड यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती सोबतच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही हे देखील या निमित्ताने समोर आले होते. या मुद्द्याची जास्त चर्चा होणे हे महाविकास आघाडीसाठी देखील हानिकारक ठरले असते म्हणूनच ठाकरे यांनी आपली तलवार म्यान केली असं म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!