अहमदनगर: राज्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. जवळपास सर्वच नेते मंडळी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अहमदनगर मध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही असे म्हणत आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. हे चोर, लुटारूंचं सरकार आहे, अशी टीका देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा पहिला पक्ष आमचा होता. पण मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की, आंदोलन एवढं खेचू नका की तुम्हीच अडचणीत येऊ शकाल. पण हा सल्ला एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मान्य केला नाही व उपटसुम कामगारांच्या नेत्यांच्या पाठीमागे लागल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फसगत झाल्याचं दिसून येत आहे”, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा निरोप दोनदा मुख्यमंत्र्यांकडे नेला परंतु उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री आहेत पण कर्तृत्वाने मुख्यमंत्री नाहीत, एवढच मला नमूद करावंसं वाटतंय, असे आंबेडकर म्हणाले.
“पवार साहेब दाऊदचा माणूस…” निलेश राणेंचा घणाघात
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मंत्री नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “पवार साहेबच दाऊदचा माणूस असू शकतात” असं ट्विट त्यांनी केले आहे. त्यांचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
