🕒 1 min read
पुणे : आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतून गुजराती माणूस निघून गेल्यास मुंबईवर काहीही परिणाम होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे त्यांनी असंही सांगितलं कि, “मुंबईतील मिल्स या राजस्थानी माणसांच्या होत्या पण संपानंतर ते इथून निघून गेले. परंतु ते गेल्यानंतर सुद्धा मुंबई आर्थिक राजधानी राहिली. कापड बाजारावर राजस्थानी लोकांचं असलेलं वर्चस्व संपलं आणि आता या बाजारावर दक्षिणेकडील लोकांचं वर्चस्व आहे, अशी परिस्थिती दिसून येते.”
“तर दुसरीकडे मुंबईमध्ये असणारा जो गुजराती माणूस आहे, तो इलेक्ट्रॉनिक बाजारातला नसून दाना बाजार आणि दवा बाजारामध्ये गुंतलेला आहे आणि तो अधिक प्रमाणात दलाली करतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो गुजराती माणूस सुद्धा निघून गेला तरीही मुंबईवर काहीही परिणाम होणार नाही. उलट गुजराती माणूस इथून निघून गेल्यास जी परिस्थिती राजस्थानी मिल मालकांची झाली तीच परिस्थिती गुजराती माणसांचीही होईल. मात्र मुंबईवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, याची जाणीव राज्यपालांना नसावी”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Governor Bhagat Singh Koshyari | “नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्पष्टीकरण
- Devendra Fadnavis | राज्यपालांनी अतिशोक्ती अलंकार वापरला, ते खुलासा करतील – देवेंद्र फडणवीस
- Sharad Pawar | “राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंतःकरण याच्यात काही फरक नाही”; शरद पवारांची जहरी टीका
- Sushma Andhare | राज्यपालांवर राज्यापेक्षाही भाजपला सांभाळण्याचीच जबाबदारी जास्त- सुषमा अंधारे
- Supriya Sule | बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा – सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
