Share

Devendra Fadnavis | राज्यपालांनी अतिशोक्ती अलंकार वापरला, ते खुलासा करतील – देवेंद्र फडणवीस

Published On: 

धुळे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. या विधानाशी आपण सहमत नसल्याची भूमिका भाजपाने घेतलेली दिसून येते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपण कोश्यारींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच राज्यपालांचं विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य, त्याचं श्रेय हे सर्वाधिक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसाने जी प्रगती केली, त्यामुळे त्याचं जगभरात नाव झालंय. विविध समाजांचं योगदान नाकारता येणार नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक यांचा सहभाग सर्वाधिक आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!