मुंबई : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात भेट होत आहे.
दुसरीकडे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणात यावे. अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता. तसेच ते कोल्हापुरात मुक आंदोलनात सहभागी देखील झाले होते.
राजे सत्तेत आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. जे जे लोक आरक्षणाच्या भूमिकेला पाठींबा देणारे असतील त्यांना सोबत घ्यावे. आम्ही ही सोबत असू. असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोव्यातील लॉकडाऊन कधी उठणार? जाणून घ्या मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले..
- पालकमंत्र्यांनी जाहीर केले ५० एमएलडी, प्रत्यक्षात मिळणार २० एमएलडी पाणी!
- राकेश टिकैत यांचा एल्गार, शेतकरी देशातील सर्व राजभवनांना घेराव घालणार
- ‘महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा’, जयंत पाटलांनी मिसळला राऊतांच्या सुरात सूर
- ‘तुमच्या पक्षातील लोकही तुम्हाला घाबरत असतील’; राज्यपालांनी केलं महापौर पेडणेकरांच ‘खास’ कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
