मुंबई : आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजभवन गाठून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष सुरूच आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर या राज्यपालांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्या असता, राज्यपालांनी पेडणेकरांचं तोंडभरून कौतुक केलंय.
राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. pic.twitter.com/3eA1GavdGb
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) June 17, 2021
‘यू आर दी मोस्ट ऍक्टिव्ह मेयर, तुम्हाला तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील,’ अशा शब्दांत राज्यपालांनी पेडणेकरांचं कौतुक केलं. यानंतर पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ‘कुणाचाही वाढदिवस असला तर आपण शुभेच्छा देतोच. शहराची प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यास गेले. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलीचं कौतुक करावं तशा पद्धतीने राज्यपाल आणि माझं बोलणं झालं.’ इतकंच नाही तर, ‘मला प्रोटोकॉल रोखतो, नाहीतर मलाही तुमच्या घरी यायला, सर्वांना भेटायला आवडलं असतं,’ असं देखील राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र येऊन चहा पितात – चंद्रकांत पाटील
- ‘शिवभोजन थाळीचं नंतर बघू, आधी शिवसैनिक वाझे-शर्मा यांची ‘आत’मध्ये भत्त्याची व्यवस्था करा’
- कसोटीचे महाभारत! सामना सतरावा/अखेरचा, पंतच्या शतकापुढे इंग्लड चारीमुंड्या चित
- हायकमांडने लक्ष घातल्यानंतरही वाद थांबेना,पंजाब कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरूच
- खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई


