🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे. आधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस राज्यात स्वबळावर लढणार असून आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील भाजप राज्यात स्वबळावरच लढणार असल्याच जाहीर केले.
या दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष… सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.
यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. त्या दृष्टीने सामनाने मत व्यक्त केल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे’, असं जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- हायकमांडने लक्ष घातल्यानंतरही वाद थांबेना,पंजाब कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरूच
- ‘शिवभोजन थाळीचं नंतर बघू, आधी शिवसैनिक वाझे-शर्मा यांची ‘आत’मध्ये भत्त्याची व्यवस्था करा’
- ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटुंनी मोडला गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम
- …तर मी दोन वर्षापुर्वीच निवृत्त झालो असतो, रॉस टेलरचा धक्कादायक खुलासा
- भारताविरुद्ध कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या ‘या’ खेळाडुंने ठोकले झंझावती शतक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
