🕒 1 min read
औरंगाबाद : शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आता १५ ते २० एमएलडी पाणी वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन आखले आहे. मात्र पालक मंत्री सुभाष देसाई यांनी शहराला ५० एमएलडी पाणीपुरवठा होऊ शकतो असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात ५० एमएलडी पाणीपुरवठा शक्य नाही. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी क्रॉस कनेक्शन देऊन पाणी वाढ केली जाईल. तसेच गळत्या बंद करून वाया जाणारे २० एमएलडी पाणी वाढण्याची अपेक्षा आहे, असे नमूद केले आहे.
जायकवाडी येथील पंप लवकरच बदलण्यात येणार आहे. जुन्या दोन्ही योजनांना क्रॉस कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची मदत घेतली जात आहे. वॉटर ऑडीटचा अहवाल प्राप्त होताच कामाला सुरूवात केली जाईल, अशी माहिती पांडेय यांनी दिली. शहराच्या दोन्ही योजनांद्वारे होणारा पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याने राज्य सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयाची नवीन जलयोजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या कामास आता सुरूवात देखील झाली आहे.
एमजेपीच्या माध्यमातून या योजनेचे काम केले जात असून त्यांनी जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून सध्या नऊ जलकुंभ, दोन एमबीआर व एक जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. नो नेटवर्क एरियाला देखील पाणी देण्यात येईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहिर केलेले आहे. यासंदर्भात आयुक्त पांडेय यांनी सांगितले की, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी विचारविनिमय करुनच शहराच्या पाणीपुरवठयात वाढ करण्याची तयारी केली जात आहे.
साधारणपणे १५ ते २० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जायकवाडी येथील पंप बदलावे लागणार आहे. मात्र ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे या वाहिन्या कधीही फुटण्याचा धोका आहे. या वाहिन्यांची क्षमता लक्षात घेऊनच पाणी पुरवठयामध्ये वाढ करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हायकमांडने लक्ष घातल्यानंतरही वाद थांबेना,पंजाब कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरूच
- ‘शिवभोजन थाळीचं नंतर बघू, आधी शिवसैनिक वाझे-शर्मा यांची ‘आत’मध्ये भत्त्याची व्यवस्था करा’
- ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटुंनी मोडला गांगुली-द्रविड-कुंबळेचा विक्रम
- …तर मी दोन वर्षापुर्वीच निवृत्त झालो असतो, रॉस टेलरचा धक्कादायक खुलासा
- भारताविरुद्ध कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या ‘या’ खेळाडुंने ठोकले झंझावती शतक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
