Share

‘प्रकाश आंबेडकरांचा स्वबळावर एकही आमदार, खासदार विजयी झाला नाही’, आठवलेंनी जखमेवर मीठ चोळले

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमशी हातमिळवणी केली होती. त्यावेळी ते स्वत: अकोला आणि लोकसभा या दोन लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले. परंतू मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. फक्त औरंगाबादचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या लढतीत निसटते विजयी झाले. तेथेही एमआयएमचा प्रभाव जास्त असल्याने जलील यांच्या विजयाचे श्रेय प्रकाश आंबेडकरांना मिळालेच नाही.

त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकरांना आपला प्रभाव पाडता आला नाही. उलट गोपीचंद पडळकरांसारखे शिलेदार त्यांना सोडून गेले. त्यामुळे आंबेडकरांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दुसरीकडे रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपासोबत जाऊन केंद्रिय मंत्रिपद पदरात पाडून घेतले. स्वबळाची चाचपणी करण्यापेक्षा त्यांनी भाजपाला जवळ केले.

दरम्यान, आता रिपब्लिकन गटांचे ऐक्य करून आगामी महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करण्यात येत आहे. अनेक शहरात अनेक गटांमुळे मतविभाजन होऊन रिपब्लिकन पक्षांना फटका बसतो. महापालिका निवडणुकीत यापूर्वीही आघाडीचे प्रयत्न झाले. पण, अपेक्षित यश मिळाले नाही. आता नवीन आघाडी होत आहे.

या रिपब्लिकन ऐक्यावर अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ‘रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही आपलीदेखील इच्छा आहे. मात्र सध्या ते शक्य नसल्याचे सूचक मत आठवले यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले, तर रिपब्लिकन ऐक्य शक्य आहे. परंतु, सध्या तरी त्याची तिळमात्र शक्यता वाटत नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर आमचे आमदार, खासदार निवडून येऊ शकत नाहीत’ असे आठवले म्हणाले.

तसेच वंचित बहुजन आघाडीनं मागच्या निवडणुकीमध्ये एकट्याच्या बळावर लढण्याचा प्रयोग केला. पण त्यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. केवळ मतं खाण्याचं काम केलं गेलं आणि मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही,’ असा बोचरा टोला आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!