Share

बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप; वंचित बहुजन आघाडीची राज्यपालांकडे चौकशीची मागणी

Published On: 

🕒 1 min read

अकोला: राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Minister of State and Guardian Minister of Akola District Bachchu Kadu) यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (President of vanchit Bahujan aghadi Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान बच्चू कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून अपहर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे. आता यासंबंधी कागदपत्रे पाहिल्यानंतर योग्य त्या सूचना देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आली.

नेमके प्रकरण काय?

दरम्यान बच्चू कडू यांनी जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्ते कामात फेरफार करत आर्थिक अपहार केल्याचा आरोप करण्यात आला असून यात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचे नाव समोर आले आहे. या अपहाराबाबत सर्व पुरावे आणि संबंधित माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना निवेदन दिल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!