नवी दिल्ली : काल(७ फेब्रु.) लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,‘लॉकडाऊनमध्ये जेव्हा संपूर्ण देश टाळेबंदीचे पालन करत होता. त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त करत होते.’ तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला, असेही मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मागील दोन वर्षांमध्ये देश शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवे. आत्तापर्यंत किती नेत्यांनी लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले? जनतेला कोरोना नियमांच्या पालनाचे आवाहन त्यांनी सातत्याने केले असते तर, भाजप सरकारला लाभ मिळाला असता का?,’असा सवालही मोदींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना…’, संजय राऊतांनी व्यक्त केल्या भावना
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- राम कदम यांच्या पत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘लतादीदींचे स्मारक बनवणे…’
- धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर आरएसएस विश्वास ठेवत नाही- मोहन भागवत
- “लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


