सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी (Nitesh Rane bail application to be heard today) होणार आहे. काल (७ फेब्रुवारी) लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान आजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या नितेश राणे यांची प्रकृती ठीक नसल्याने तसेच पाठीचा आणि मानेचा त्रास वाढल्याने त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करता संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे, त्यांच्या समोरच घ्यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे या अर्जावरदेखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा…
- सूर्यकुमार यादवने टाकले नवजोत सिंग सिद्धूला मागे, केला अनोखा विक्रम…
- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दिवसभर मोफत तपासणी
- गुरमित राम रहीमला २१ दिवसांची रजा
- पुणे शहर काँग्रेस मध्ये आघाडी करण्याबाबत संभ्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

