Share

Prajkta Mali in London | हास्यजत्रेमध्ये आपल्या अदांनी सर्वांना मोहून टाकणारी प्राजक्ता सोशल मीडियावर ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

सोनी मराठीवरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील फेम प्राजक्ता माळी शो मधून ब्रेक घेऊन लंडनला फिरायला गेलेली आहे. ती तिचे लंडन मधील अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. चाहते ही आपल्या लाडक्या प्राजुच्या पोस्टला भरघोस प्रतिसाद देत आहे.

खरंतर हास्यजत्रेचे चाहते आपल्या लाडक्या प्राजुला मिस करत आहेत, आणि चाहत्यांबरोबरही प्राजक्ता ते सर्व मिस करत आहे. लंडन मध्ये आता प्राजक्ताला करमेना, तिला आपल्या देशाची खूप आठवण येत आहे. राजूची रिसेंट पोस्ट वाचल्यावर ते तुमच्या सुद्धा लक्षात येईल.

प्राजक्ताची पोस्ट 

ने मजसी ने परत मातृभीला….
सागरा प्राण तळमळला…
.
भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…
एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही…
त्याला अनेक कारणं आहेत..,
१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?.
२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत.. इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली… (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.)
काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती.
.
असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. आपण इतर देशांचे उगा गोडवे गातो… त्यामुळे यानिमित्तानं हे इथं लिहीणं महत्वाचं वाटलं… देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले.
फक्त २ दिवस बाकी.. आलेच…
.
थेम्स नदीच्या काठावर…
#india #indian #prajakttamali

https://www.instagram.com/p/CjCzy27LeU3/

या पोस्टमध्ये प्राजक्ताची आपल्याला देशाप्रतीची भावना समजत आहे. मात्र ही पोस्ट लिहिताना त्यात अनेक चुका झाल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळे कमेंट्सद्वारे या पोस्ट साठी प्राजक्ताला ट्रॉल करण्यात आले आहे.

एका नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे, ‘थेंब्स की थेम्स’ त्यावर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘ह्या ताई भारत किती महान हाय हे समजून घ्यायला परदेशात गेल्यात’.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!