बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रावेळी लोकांच्या प्रेमाबद्दल आपलं मत व्यक्त करताना सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
निवडणुकांमध्ये होणारी पडझड आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेली नाही, कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिलं तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार देखील आले आहेत, 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली असून मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे, पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं आहे की शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर जातात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही, पण काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांनी महिलांसाठी आरक्षण आणलं, महिला उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेत आल्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये महिला आल्या, आता आपली इच्छा आहे की, लोकसभा आणि विधानसभेमध्ये देखील महिला यायला हव्यात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसची तर आरक्षणाची मागणी आहेच, पण मी आरक्षणातून लढणार नसल्याचं सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मी सर्वसाधारण ओपन सीटमधून लढणार असून मी कुठल्या तोंडाने आरक्षण मागणार आहे? मी शिकली सवरलेली असून ओपन सीटमधून निवडून आलेली आहे, त्यामुळे मी आरक्षणामधून उमेदवारी मागणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. मात्र, कुठल्याही महिलेला गरज असेल तर तिच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार असल्याचं त्या म्हणाल्या. कारण त्यांना तेवढं शिक्षण मिळालं नाही आणि खासदारकीची संधी मिळालेली नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Lata Mangeshkar Award | उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
- Anil Deshmukh । अनिल देशमुखांची दिवाळी गोड होणार नाही?; जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला
- Ramdas Kadam | “भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे”
- Devendra Fadnavis । मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde । मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री आणि आमदारांना झापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

