Share

प्राजक्ता गायकवाडचा नऊवारी साडीतील साज चाहत्यांच्या पसंतीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंचे पात्रं उत्तमरित्या साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आणि या मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याचं देखील तिने सांगितलं होत.

प्राजक्ता गायकवाड नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ आणि फोटो ती आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तसेच ती सोशल मीडियावच्या माध्यमातून चाहत्यांसोबत सवांद देखील साधताना दिसते.

https://www.instagram.com/p/CSRaNB0MQTp/?utm_medium=copy_link

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने भारतीय पारंपरिक पेहरावात नऊवारी साडी परिधान केल्याचे दिसत आहे. निळ्या रंगाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने आणि मोत्याची नथ असा प्राजक्ताचा मराठमोळा थाट या फोटोंमध्ये तिने केला असल्याचे दिसत आहे. या साडी मध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोला  नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!