मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळलं असलं तरी ‘ऑपरेशन लोटस’ ची नांदी होत असल्याची कुजबुज आता सुरु झाली आहे.
दरम्यान, अहमदाबादेतील या भेटीवेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते असं या वृत्तपत्रात छापण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीवर अमित शाह यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर, दोन्ही पक्षातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.
या कथित भेटी दरम्यान हजर असल्याच्या चर्चा असलेले प्रफुल्ल पटेल यांनी आता या भेटीवर मौन सोडलं आहे. ‘भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचा पाय शरद पवार यांनीच रचला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार स्थिर व सुरक्षित आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये काही तथ्य नाही,’ असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आज समजले मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ का करत नव्हती’
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- लॉकडाऊन बाबत राष्ट्रवादीमध्येच मतभेद ? नवाब मलिकांनी केला विरोध
- ‘शिवसेनेचे राऊत पवारांचा जप करतायत…महाराष्ट्राचं राजकारण आता किळसवाणं झालंय’
- पवार साहेब-शाहांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे – जितेंद्र आव्हाड


