Share

‘शिवसेनेचे राऊत पवारांचा जप करतायत…महाराष्ट्राचं राजकारण आता किळसवाणं झालंय’

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांपासून ते सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. हे सरकार तीन भिन्न विचारांचं असून एकसूत्री नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत.

सद्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत सर्वच पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण किळसवाणं झालं असून कधीही कोणताही नेता कोणाचीही भेट घेत आहे. यातून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असं टीकास्त्र देखील सोडलं आहे.

‘महाराष्ट्राचं किळसवाणे राजकारण बघवत नाही. सगळेच पक्ष सकाळी एक बोलतात, तर दुपारी काहीतरी तिसरेच. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. पण जप शरद पवारांचा करतात. कोणी उठत कुणालाही भेटायला जात. ह्याला आपण लोकशाही म्हणणार का? लोकांचे मत गेलं चुलीत,’ अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!