Share

लॉकडाऊन बाबत राष्ट्रवादीमध्येच मतभेद ? नवाब मलिकांनी केला विरोध

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. ‘राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार करण्यात येत आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे,’ असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

तर दुसरीकडं, ग्रामविकास मंत्री तथा अहमनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासोबतच कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी सूचना दिल्या आहेत. यानंतर लॉकडाऊन बाबत बोलताना ते म्हणाले, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. अशीच संख्या वाढत गेली तर संक्रमण साखळी तोडण्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे.’ असा इशाराच मुश्रीफ यांनी दिला आहे. यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांमध्येच मतभिन्नता असल्याने लॉकडाऊन होणार की नाही ? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम अधिक वाढत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!