मुंबई – मुंबई महापालिका अर्थसंकल्पीय तरतुदींच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहेत.महापालिका स्तरावर अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये निधी वाटप करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील ४० टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ८३ नगरसेवकांना एकही रुपया निधी दिला नाही असा आरोप भाजपने केला आहे.
दरम्यान, याबाबत अर्थसंकल्पावेळी हरकतीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांना साधे बोलूही दिले नाही. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक गटाने अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
महापौरांची ही कृती विकासकामांना खोडा घालणारी असून वेळ आल्यानंतर त्याला सर्वसामान्य मुंबईकर जनताच चोख प्रत्युत्तर देईल अशी टीका करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांच्या या दुजाभाव करणाऱ्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला.
शिंदे म्हणाले,महापौर हे पद मुंबईतील सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करते. मात्र, केवळ राजकीय आकसातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना निधी वाटपात महापौर पेडणेकर यांनी डावलले आहे. हा सरळ सरळ सर्वसामान्य मुंबईकरांवर अन्याय केल्याचा आरोप केला असून त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सर्वसामान्यांच्या हिताची विकास कामे करताना निधीची कमतरता भासणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबाद जिल्हा; एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट!
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा


