अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तो लवकरात लवकर मागे घ्यावा. देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या गोण्या खाली ओतून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक अशा घोषणा देत कांदा निर्यात बंदी त्वरित उठविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
संपूर्ण देश जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेस शेतकरी शेतामध्ये राबून अन्नधान्य पिकवत होता. आधीच हवालदिल असलेल्या शेतकर्यास केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घालून मोठी चपराक दिली आहे. शेतीला चालना देण्याऐवजी केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्यांना देशोधडीस लावण्याचे काम करीत असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, अमोल कांडेकर, विजय बोरुडे, मयुर विधाते, संतोष ढाकणे, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, शहानवाझ शेख, सुफियान शेख, गणेश बोरुडे, उषा सोनटक्के, किरण कटारिया, शितल गाडे, विनोद खैरे, अक्षय घोरपडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
- कांद्यासाठी आंदोलन करणारे, मागील सहा महिन्यांपासून शेतकरी संकटात असताना कुठे होते?- राधाकृष्ण विखे
- कोरोनाची दाहकता सांगताना या अधिकाऱ्याला अश्रू झाले अनावर
- या बोललीवूड स्टारसह दिग्दर्शकांना कोर्टाचा समन्स तर सलमानला…
- ‘या’ ट्विट नंतर पूजा भट्ट सोशल मिडीयावर झाली भलतीच ट्रोल…
- पदवी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांस नोकरी नाकारणाऱ्यांवर होणार कारवाई; मंत्री उदय सामंतांनी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

