मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बरेच जण समोर आले, सुशांत सिंह निधन प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अभिनेता व अभिनेत्री हे प्रकरण सुद्धा समोर आले, सुशांत निधन प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे दरम्यान नवीन नवीन सत्य समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेक जणांना अटक केली आहे.यावर आता अभिनेत्री पूजा भट्ट हिने वक्तव्य केले आहे.
ट्विटरवर ड्रग्स प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. जे लोक दुःख कमी करण्यासाठी ड्रग्सचे सेवन करतात, अशा लोकांची कोणाला काळजी आहे का? या लोकांची अवस्था व समस्या तुम्हाला माहित आहेत का? असा सवाल पूजा भट्ट ने केला आहे.
आपल्या ट्विटमधून तिने आर्थिक व मानसिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांवर प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे ती म्हणाली आहे की, जे लोक ड्रग्स घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी होईल. अशा शेवटच्या उपेक्षित लोकांबद्दल कोणाला काळजी आहे का? असाही सवाल ट्विटरच्या माध्यमातून तिने केला आहे.
आपल्या नशिबी आलेली गरिबी आणि दुःख यांसारख्या कारणामुळं काही लोकं ड्रग्स पदार्थांसारख्या गोष्टींचा वापर करत असतात. या लोकांचे आयुष्य सुधारण्यात कोणाला रस आहे का? असं ट्विट पूजा भट्टने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. पूजा भट्ट या ट्विट मूळे सोशल मिडीयावर भलतीच ट्रोल होत आहे.
Does anyone care about people who live on the ultimate fringe of society,who use drugs to make the pain of living go away? The ones who are too battered & broken to chase dreams but chase substances amidst much poverty & squalor? Anyone interested in their rehabilitation?
— Pooja Bhatt (@PoojaB1972) September 16, 2020
पूजा भट्टचा सडक सिनेमाचा रिमेक सडक २ हा सिनेमा या दरम्यान प्रदर्शित झाला होता परंतु या सिनेमाला प्रेक्षकांनी जेवढी पसंती सडक या सिनेमाला दिली होती तेवढी पसंती सडक २ या सिनेमाला मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या :
- सुशांतला वाटत होती रियाची भीती कारण…
- सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक नाही तर राजीनामा देणार; उदयनराजे भडकले
- कांद्यासाठी आंदोलन करणारे, मागील सहा महिन्यांपासून शेतकरी संकटात असताना कुठे होते?- राधाकृष्ण विखे
- कोरोनाची दाहकता सांगताना या अधिकाऱ्याला अश्रू झाले अनावर
- या बोललीवूड स्टारसह दिग्दर्शकांना कोर्टाचा समन्स तर सलमानला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

