औरंगाबाद : कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना फटका बसला. तर एप्रिल, मे हंगामात होणाऱ्या परीक्षा देखील या काळात रद्द कराव्या लागल्या. मात्र, पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षांवरून मोठा तिढा निर्माण झाला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता परीक्षा घेतल्या जाणार असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मोठा खुलासा केला आहे.
“अंतिम वर्षातील 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले 10 टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे,” अशी माहिती उदय सामंतांनी दिली.
निकालाबाबत काय म्हणाले सामंत?
१ ऑक्टोबरपासून राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचे निकाल येत्या 10 ऑक्टोबरपासून लागायला सुरुवात होईल. या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा देण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाईल. तसेच, यावर्षी पदवी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी नाकारल्यास कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील उदय सामंत यांनी दिला आहे. त्यामुळे गेले काही महिने भविष्याबाबत चिंतीत असलेल्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- सुशांतला वाटत होती रियाची भीती कारण…
- सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक नाही तर राजीनामा देणार; उदयनराजे भडकले
- कांद्यासाठी आंदोलन करणारे, मागील सहा महिन्यांपासून शेतकरी संकटात असताना कुठे होते?- राधाकृष्ण विखे
- सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक नाही तर राजीनामा देणार; उदयनराजे भडकले
- या बोललीवूड स्टारसह दिग्दर्शकांना कोर्टाचा समन्स तर सलमानला…


