Share

कांद्यासाठी आंदोलन करणारे, मागील सहा महिन्यांपासून शेतकरी संकटात असताना कुठे होते?- राधाकृष्ण विखे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. कांदा निर्यात बंदी उठावी ही सर्वांची मागणी असून याबाबत केंद्र सरकार लवकरात लवकर निर्णय करेल अशी अपेक्षा आहे. मात्र कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारला लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या मागील सहा महिन्यांच्या संकट काळात शेतकऱ्यांना कोणती मदत केली, असा सवाल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनामुळे बाजार समित्या बंद राहिल्या, शेतीमालाला भाव नाही तेव्हा शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात आपला माल विकला तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते झोपले होते का? ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर युरिया खताची टंचाई होती.

सोयाबीन बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली तेव्हा आजचे आंदोलन करणारे कुठे होते, असे प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारकडून मागील सहा महिन्यांत कुठलीही मदत शेतकऱ्यांना झाली नाही. केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेईपर्यंत राज्य सरकारने कांदा उत्पादकांना मदत करावी अशी मागणी आ.विखे यांनी केली आहे.

कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर जिल्ह्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली असून लवकरात लवकर निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी ही सर्वांचीच मागणी असून याबाबत केंद्र सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल असेही आ.विखे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!