Share

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत मिळणार 65 टक्के अनुदान!

Published On: 

🕒 1 min read

नाशिकः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राज्यातील 15 जिल्ह्यांमधील एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 125 ग्रामपंचायतींची निवड केली आहे. या अभियानातून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

किती मिळणार अनुदान?

प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांकरिता 2 हेक्टर पर्यंत जमीन धारकांना 75 टक्के आणि 2.5 हेक्टर जमीनधारकांना 65 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. महिलांना पिकांवरील किडी रोगाची ओळख व नियंत्रण करण्यासाठी शेतीशाळा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी, जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी अणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. याबरोबरच योजनांची माहिती व लाभ घेण्याकरीता विविध ॲपही तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!