Share

कोव्हीड लसीकरणासाठी एमआयएम पक्षाने लावले पोस्टर, नागरिकांना केले लस घेण्याचे आवाहन

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणाला पर्याय नाही. त्यात दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र, तरी देखील समाजातील अनेक घटक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एमआयएमच्या वतीने शहरातील विविध भागात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एमआयएमच्या वतीने लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांचे लस घेतांनाचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. तसेच ‘आम्ही लस घेतली तुम्हीही लस घ्या’ असे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लीम आणि इतर काही समाजात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एमआयएमच्या वतीने करण्यात आलेले हे आवाहन महत्त्वाचे ठरणार आहे.

नागरिकांचे कोरोना विषाणू पासून संरक्षण व्हावे, यासाठी हे होर्डिंग्ज लावण्यात आले असल्याचे एमआयएमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील कटकट गेट, रोशन गेट, व्ही.आय.पी. रोड आदी भागांमध्ये हे पोस्टर लागले आहेत. यामुळे औरंगाबाद शहरातील लसीकरणाचा वेग वाढल्यास त्याचा फायदाच होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!