Share

लालूप्रसाद यादवांची प्रकृती आणखी बिघडली; डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यात आरोपी असलेले लालूप्रसाद यादव सध्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे.

लालूप्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी परिवाराला दिला आहे. लालूप्रसाद यांना निमोनिया झाला असून त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचले आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सूज आली आहे आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

पुढे बोलताना लालूप्रसाद यादव यांची एक किडनीही निकामी झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली.

डॉक्टरांच्या पथकाकडून लालूप्रसाद यांच्या प्रकृतीचा अहवाल आल्यावर तुरुंग प्रशासन कनिष्ठ न्यायालयाकडून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी घेणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर शनिवारीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!