नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा एका मोहिमेमुळे ते चर्चेत आले आहेत. लालू यादव यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी यासाठी तेज प्रताप यादव यांनी एक आगळीवेगळी मोहिम सुरू केली आहे.
लालूंच्या सुटकेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ५० हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. मानवतेच्या भावनेतून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी या पत्रांद्वारे करण्यात आली आहे. या पत्रांना आमदार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी ‘आझादी पत्र’ असे म्हटले आहे.
जोपर्यंत वडीलांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहिल, असे त्यांनी म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या समर्थकांची पत्रे आम्ही गोळा करत आहोत. राष्ट्रपतींना मला भेटण्याची परवानगी द्यावी, असेही तेजप्रताप यांनी म्हटले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कारागृहातून रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र लालूंवर चांगले उपचार व्हावे यासाठी लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलविण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- केंद्र सरकारच्या दबावानंतर ट्विटरने 97 टक्के अकाउंट केले ब्लॉक


