Share

संकष्टी चतुर्थी असली तरीही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार

Published On: 

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यामध्ये रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन आदेशाप्रमाणे ३० जूनपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

यंदा आषाढी वारीसाठी पंढरपुरात एकाही वारकऱ्याला प्रवेश नाही

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार काही राज्यांतील मंदिरे दिनांक 8 जून पासून खुली होत असली, तरीही राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील मंदिरे 30 जून पर्यंत बंदच राहणार आहेत.दि. 8 जून रोजी संकष्टी चतुर्थी असली तरी दगडूशेठ मंदिर बंदच असून गर्दी करू नये, असे आवाहन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

आपण अग्रलेख लिहीण्यापलिकडे काय केलं? सोनूची बाजू घेत मनसेने राऊतांना झापलं

दरम्यान, पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7,722, तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2,413 इतकी नोंदविण्यात आली आहे. शहरात एकूण मृत्यू 372 झाले आहेत. आजपर्यंत कोरोनमुक्त झालेल्या 4,934 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात या आल्याचे पुणे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!