नवी दिल्ली : करोनाच्या संकट काळात दारू विक्रीचा मुद्दा कायम चर्चेत राहीला आहे. याकाळात दारू विक्रीला परवानगी देण्यावरून वाद झाले.पुढे काही काळाने लॉकडाऊन दरम्यान राज्य सरकारांना काही महसूल मिळावा यासाठी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. यावरून देखील संमिश्र अश्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल
मद्य विक्रीसाठी केंद्राने परवानगी दिल्यावर काही राज्यांनी दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स लावला होता यावरून काहीशी नाराजी मद्यप्रेमी लोकांमध्ये पाहायला मिळाली होती. अशाप्रकारचा टॅक्स लावणारं दिल्ली हे देशातील पहिलं राज्य होतं. आता याच दिल्लीमध्ये मात्र मद्य स्वस्त होणार आहे.
Delhi Government has decided to withdraw the 'special corona fee' levied at 70% of the maximum retail price on all categories of liquor, with effect from 10th June 2020. pic.twitter.com/vDn3LPcA8p
— ANI (@ANI) June 7, 2020
टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, केजरीवाल सरकारने आता सर्व दारूच्या ब्रँडवर लावण्यात आलेली विशेष कोरोना फी मागे घेतली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर ७० टक्क्यांपर्यंत स्पेशल कोरोना फी लावली होती. त्यामुळे राजधानीत दारूचे दर वाढले होते.
यंदा आषाढी वारीसाठी पंढरपुरात एकाही वारकऱ्याला प्रवेश नाही
दरम्यान, यापूर्वी दिल्ली सरकारने ५ मे रोजी सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर (एमआरपी) ७० टक्के कोरोना उपकर लावला होता. दारूच्या किंमती वाढल्याबद्दल दिल्ली सरकारलाही टीकेचाही सामना करावा लागला होता. तसंच दिल्ली उच्च न्यायालयातही या प्रकरणाला आव्हान देण्यात आले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

