औरंंगाबाद : कोरोना संसगर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांची, बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांसह सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, बालरोगतज्ञ आणि आरोग्ययंत्रणांनी उपचार सुविधांसह सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.४) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालकोविड संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत बालरोग तज्ञांसमवेतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, घाटीचे डॉ. दिक्षित, डॉ. एल.एस देशमुख, डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. अमोल जोशी यांच्यासह विविध खासगी रूग्णालयातील बालरोगतज्ञ, आरोग्य यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हयात संभाव्य तिसऱ्या लाटेतील संसर्गात ० ते १८ वर्षाखालील वयोगटातील सर्व बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत हा संसर्ग पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालय, सर्व बालरोगतज्ञ, वैद्यकीय तज्ञ आणि आरोग्य यंत्रणा यांनी सर्तक रहावे असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सूचित केले.
घाटी, मनपा, जिल्हा रुग्णालयासोबत सर्व खाजगी रुग्णालयांनी समन्वयपूर्वक संसर्गापासून वेळीच बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, वाढीव आवश्यक उपचार सुविधा, औषधसाठा यासह इतर सर्व बाबीचे पूर्वनियोजन प्रभावीपणे करावे. तसेच वाढीव प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ, खाटांची उपलब्धता सज्ज ठेवावी. घाटीने बालरोगतज्ञ, नर्स यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. तसेच आवश्यकतेनुसार मिल्क बँक सुविधा तयार ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
