Share

हार्ट अटॅकनंतर पहिल्यांदाच टीव्ही शो मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा झाला भावुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कलर्स टीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो’डान्स दिवाने ३’ या कार्यक्रमाच्या २०मार्चला होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा याने हजेरी ला[वली आहे. ३ महिन्यापूर्वी रेमो डिसूझाला हार्ट अटॅक आला होता. यातून बरा झाल्यानंतर रेमो डिसूझा पहिल्यांदाच या टीव्ही शो मध्ये सहभागी झाला आहे. मात्र यावेळी या कार्यक्रमात एक डान्स सादर करण्यात आला. जे पाहून रेमो डिसूझासह इतर कलाकार देखील खूपच भावूक झाले.

या कार्यक्रमात एका स्पर्धकाने आपल्या डान्सच्या माध्यमातून रेमो डिसूझाला आलेला हार्ट अटॅक आणि त्याने कशापद्धतीने याचा सामना केला हा प्रवास दाखवला. कलर्स टीव्हीनेआपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या डान्स परफॉर्मसची एक झलक दाखवण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/CMeqvWZAXum/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी भावूक होत रेमो डिसूझा म्हणाला की, ‘मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा झाले आहे की मी भावुक झालो आहे . या कार्यक्रमचा जज धर्मेश येलांडे रेमोला आपला मार्गदर्शक मानतो. त्यामुळे तो त्याच्या खूपच जवळचा आहे. त्यामुळे धर्मेशला देखील आपल्या भावना अनावर झाल्या आणि तो म्हणाला की , ‘ मी देवाकडे प्रार्थना करतो की पुढे काही झाले तर आधी मला व्हावे नंतर त्यांना व्हावे. त्यांच्यापर्यंत ते पोहचू नये.’त्यानंतर रेमो डिसूजाने धर्मेशला मिठी मारली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!