नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्यानंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. इस्रायलच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केल्यानंतर दिल्लीसह इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
गुप्तचर संस्थेनं जारी केलेल्या अलर्टनुसार, IS KP या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षित दहशतवादी भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवादी संघटनेच्या उच्च कमांडनं भारतात उपस्थित असलेल्या त्याच्या स्लीपर सेलशी संपर्क साधला आहे.
भारतात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना IED बनवण्यासाठी आणि लहान शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इस्रायलचा दूतावास आणि परिसरात नजर ठेवण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांसह निम्नलष्करी दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य तालिबानमध्ये केले असते तर चौकात फटके मारले असते- सुधीर मूनगंटीवार
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- ‘सत्तेत आल्यावर महिलासबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- ‘..मग शिवाजी महाराजांना अटक केली असती का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

