Share

‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंग पावल्याचं स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली.

दरम्यान, या निकालावर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भाष्य करताना राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘बेळगावचे नेते, जनता आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या प्रकरणात शिवसेनेचे संजय राऊत अगोदर खरं बोलले असं मी म्हणेन. ते म्हणाले होते की बेळगावात भगवा फडकेल. खरा भगवा भाजपाकडेच आहे हे आता स्पष्ट झालंय. एवढीच प्रतिक्रिया देईन,’ असं शेलार म्हणाले.

यासोबतच, सामना अग्रलेखात हिंदुत्वाविषयी केलेल्या टिप्पणीबाबत शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी आत्ताच म्हणालो की संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागले असतील. पण कधीकधी आपल्या मित्रपक्षांच्या मालकांना खूश करायला थोडा यूटर्न घेतात. आणि त्या यूटर्नमध्ये शिवसेना आता हिंदुत्वापासून सरकली हे लपवण्याचा अतिशय काटोकाट प्रयत्न संजय राऊत करत आहेत. टिपू सुलतान जयंतीपासून बेहराम पाड्यात जिंकण्यापर्यंत, गोविंदांवर केसेस टाकण्यापासून गणेशोत्सव आणि मंदिरांच्या बंदीपर्यंत जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अपेक्षित आहे तेच शिवसेना करत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!