Share

‘सत्तेत आल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल

Published On: 

पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.

सरपंच गौरी गायकवाड तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषेद घेतली, यावेळी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या देखील यावेळी उपस्थित होत्या. पत्रकार परिषेदत बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

राज्याचे गृहमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील अशा वाईट लोकांवर तात्काळ कारवाई करायला हवी, अशी मागणी यावेळी चित्रा वाघ यांनी केली आहे. सत्तेत आल्यावर तुमची महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?, असा खोचक सवाल यावेळी वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.

महिला सरपंचाच्या मान मर्यादा या भंगल्या आहेत. महिलांवर अन्याय करणाऱ्या आरोपीला जामीन सुद्धा मिळता कामा नये, असा कायदा करावा लागेल. तसेच आजची राष्ट्रवादी ही साहेबांची राष्ट्रवादी राहिलेली नाही, अशीही टीका राष्ट्रवादीवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!