पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष-आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चंद्राकांत पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसणारे दोन चेहरे समोर येतात असं म्हटल्यावर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले होते. यावरून संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधील वाद आता पोलिसांपर्यंत गेला आहे. कारण पुणे शहर भाजपने संजय राऊत यांच्या काही विधानांवर आक्षेप घेत पोलिसांमध्ये तक्रार केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. ‘महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात असभ्य भाषा वापरून राजकीय शिष्टाचाराला तिलांजली देण्याचं काम संजय राऊत सातत्याने करत आहेत,’ अशी टीका देखील मुळीक यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जाहीरपणे असभ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या राउतांवर उद्धवजींनी कारवाई करावीच. म्हणून आज पुण्यात तक्रार दाखल करतोय. भा. द. वि. कलम 503, 505, 153-ब (१)(क) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी पुणे शहर भाजपची मागणी आहे.’
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात असभ्य भाषा वापरून राजकीय शिष्टाचाराला तिलांजली देण्याचं काम @rautsanjay61 सातत्याने करत आहेत. @BJP4Maharashtra चे अध्यक्ष आमदार @ChDadaPatil यांच्याविरोधात जाहीरपणे असभ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या राउतांवर उद्धवजींनी कारवाई करावीच. pic.twitter.com/6Z0GNGABBs
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) September 6, 2021
संजय राऊत यांची जहरी टीका –
मी चंद्रकांत पाटलांना चंपा म्हणणं योग्य नाही, असे म्हणत आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. त्यामुळे पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द फिरवणे हे तुम्हाला जमते आम्हाला नाही. आम्ही वाघाची औलाद आहोत, असं संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील एका जाहीर मेळाव्यात म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- बेळगाव महापालिका निवडणूक निकाल; भाजपला स्पष्ट बहुमत
- ‘सत्तेत आल्यावर महिलासबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल
- जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे ? राम कदम यांचा थेट सवाल
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

