पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरूनच भाजपा आक्रमक झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत त्यांच्यावर भाजप गुन्हा दाखल करणार आहे.
मी असं काय केलं आहे की तक्रार दाखल करावी. कोणाचा कोथळा बाहेर काढू असं म्हटलंय? ते पाठीत खंजीर खुपसत होते. पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केले आहेत. त्यामुळे समोर कोथळा बाहेर काढतो, त्याबद्दल शिवाजी महाराजांना अटक केली असती का? असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान यावरूनच भाजपने आक्रमक रूप घेतले आहे.
राजकारणात पाठीत खंजीर खुपसणं हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. पण आता त्या जागी वेगळाच चेहरा समोर येऊ लागला आहे. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मी चंद्रकांत पाटलांना चंपा म्हणणं योग्य नाही, असे म्हणत आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. त्यामुळे पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द फिरवणे हे तुम्हाला जमते आम्हाला नाही. आम्ही वाघाची औलाद आहोत, असं संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील एका जाहीर मेळाव्यात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- बेळगाव महापालिका निवडणूक निकाल; भाजपला स्पष्ट बहुमत
- ‘सत्तेत आल्यावर महिलासबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल
- जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे ? राम कदम यांचा थेट सवाल
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
