मुंबई: जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावरच सुधीर मूनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जावेद अख्तर यांची देशाबद्दलची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. त्यांनी भारतात केलेले वक्तव्य जर तालिबान मध्ये जाऊन केले असते, तर त्यांना भर चौकातफटके मारले असते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र याठिकाणी त्यांना असे काहीही करण्यात आले नाही. कारण भारतात लोकशाही पद्धतीचे राज्य आहे. देशातील सत्ताधारी रामराज्य आणणारे विचाराचे आहेत. केंद्राने त्यांना पोलीस पाठवून ५०५ चा वापर केला नाही. किंवा त्यांच्या घरावर कुणी आंदोलन केले नाही. कारण या देशात कायद्याने राज्य चालते. अशी प्रतिक्रिया सुधीर मूनगंटीवार यांनी दिली आहे.
जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारत्तात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबान मध्ये केले असते तर त्यांना चौकात फटके मारले असते.. @BJP4Maharashtra @abpmajhatv #JavedAkhtar pic.twitter.com/0BpJYsb4r1
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 6, 2021
तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय असून भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले आहे. यावरूनच राजकीय वादंग निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- ‘सत्तेत आल्यावर महिलासबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- ‘..मग शिवाजी महाराजांना अटक केली असती का?’


